Posts

Showing posts from August, 2020

मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नार्डो (१४६९-१५२७)- एक इटालियन ग्रंथकार व मुत्सद्दी.

  मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नार्डो (१४६९-१५२७)-  एक इटालियन ग्रंथकार व मुत्सद्दी. याचा जन्म फ्लारेन्स येथें एका मध्यमस्थितींतल्या कुळांत झाला.  व्यवहारज्ञ म्हणून लॉरेन्झोच्या दरबारीं मॅकीव्हेली प्रसिद्धीस आला. स. १४९८ त प्रजासत्ताक राज्य स्थापन झाल्यापासून मेडिसी घराणें परत येईपर्यंत (१५१२) फ्लारेन्समधील दुस-या चॅन्सेरीचा तो सेक्रेटरी होता. या काळांत त्याची सार्वजनिक चळवळींत पडणा-या लोकांशीं घसट पडली, पोपज्यूलिस (दुसरा) मॅक्सिमिलन बादशहा, १२ वा लुई व अनेक इटालियन संस्थानिक यांच्याशीं त्याचें एकसारखें दळणवळण पडलें. पण मेडिसी घराण्याचा पुन्हां अंमल सुरू झाल्यापासून त्याचें सार्वजनिक आयुष्य संपल्यासारखेंच झालें. तथापि त्याच्यावर राजकृपा होती. १५२१ त दरबारनें त्याला फ्लारेन्सचा इतिहास लिहिण्याची कामगिरी सांगितली. पण स. १५२७ त पुन्हा या मेडिसी घराण्याची हकालपट्टी झाल्याकारणानें मॅकीव्हेली निराश होऊन त्याच सालीं मरण पावला. आपल्याकडील कौटिल्य किंवा कणिक यांच्याप्रमाणेंच मॅकीव्हेली वामनीतिशास्त्रविषयीं यूरोपांत प्रसिद्ध आहे. त्याचे राजकीय ग्रंथच त्याच्या अखंड कीर्तीस कारणीभूत झाले....